Loksabah 2019 : मतदानापूर्वी मोदींनी घेतला आईचा आशीर्वाद, शहांनीही केले मतदान

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 एप्रिल 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील राणिप येथील मतदान केंद्रावर आज (ता. 23) मतदानाचा हक्क बजावला. त्यापूर्वी मोदींनी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मोदी मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तेथे उपस्थित होते. 

अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील राणिप येथील मतदान केंद्रावर आज (ता. 23) मतदानाचा हक्क बजावला. त्यापूर्वी मोदींनी त्यांच्या आई हिराबेन यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. मोदी मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तेथे उपस्थित होते. 

Modi

सकाळी साडेसात वाजता मोदी आधी गांधीनगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. आपल्या आईची भेट घऊन व आशीर्वाद घेऊन ते मतदानास निघाले. त्यांच्या आईने त्यांना गोडाचा घास भरवत आशीर्वाद दिले. अमित शहा यांनीही आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथील मोदींच्या मतदानकेंद्रावर हजेरी लावली. 

Image may contain: 4 people

मतदान करून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोटावरील शाई दाखवत छायाचित्रकारांना आपल्या स्टाईलने पोझ दिली. या दरम्यान मोदी हे अमित शहांच्या नातीशी खेळताना दिसले, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. 

modi


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi and Amit Shah casts vote at Ahemadabad