Loksabha 2019 : मोदी, राहुल गांधींकडून मतदानाचे आवाहन

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) मतदान होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) मतदान होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून नागरिकांना मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) ज्या 20 राज्यांतील 91 जागांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. त्यात महाराष्ट्र, पश्‍चिम उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेशातील प्रतिष्ठित जागांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश विधानसभेच्या 175, सिक्कीमच्या 32 आणि ओडिशा विधानसभेच्या 28 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 

यावर ट्विट करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, की लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. सर्व मतदारांना विनंती आहे त्यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे. पहले मतदान, फिर जलपान.

तर, राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 2 कोटी नोकऱ्या नाहीत, 15 लाख खात्यात नाहीत, अच्छे दिन नाही, त्याबदल्यात नोकऱ्या नाही, नोटाबंदी, शेतकऱ्यांच्या वेदना, गब्बरसिंह टॅक्स, सुटबूट की सरकार, राफेल आणि खोटे, खोटे, खोटे. भारताच्या भविष्य आणि प्रगतीसाठी मतदान करा.

Web Title: PM Narendra Modi and Rahul Gandhi urges people to vote in Loksabha 2019