Loksabha2019 : दक्षिणेत भाजपला फारसे यश मिळेल असे वाटत नाही

Loksabha2019 : दक्षिणेत भाजपला फारसे यश मिळेल असे वाटत नाही

कोल्हापूर -  कर्नाटकात काँग्रेस-धजदला तर आंध्रप्रदेश-तेलंगणामध्ये स्थानिक पक्षांना चांगले यश मिळेल. तमिळनाडूमध्ये द्रुमुक-काँग्रेस आघाडीला फायदा होताना दिसत आहे. केरळमध्ये भाजपला मते वाढताना दिसत आहेत पण जागामध्ये काँग्रेसचे वर्चस्व येथे दिसून येईल. डाव्यांची घसरण येथे होईल, असे सर्वसाधारण चित्र या निवडणूकीत दक्षिण भारतातील असेल असे मत सकाळचे संपादक संचालक आणि राजकिय विश्लेषक श्रीराम पवार यांनी सकाळ फेसबुक लाईव्हमध्ये मांडले. याबाबतचा अधिक तपशील पाहा व्हिडिओमध्ये...

श्री पवार म्हणाले, परंपरेने भाजपसाठी दक्षिण भारत हा अवघड असा भाग राहीलेला आहे. २०१४ च्या निवडणूकीमध्ये उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतामध्ये मोदींनी मिळवले आहे. पण मागच्या पाच वर्षात जे राजकारण झाले त्यानुसार यंदाच्या निवडणूकीत या जागा वाढण्याऐवजी कमी होण्याची शक्यता अधिक दिसत आहे. यासाठी उत्तर भारतामधून ज्या जागा कमी होतील त्या कशा भरून काढायच्या याचा विचार भाजपने केला यामध्ये दक्षिण आणि पूर्व ईशान्य भारत याचा विचार केला गेला. यामुळे दक्षिण भारतात काय होईल याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या २०१४ च्या निवडणूकीत १२२ पैकी ३१ जागा भाजपला मिळाल्या होत्या. पण या निवडणूकीत यामध्ये फारसा बदल होईल असे चित्र वाटत नाही. 

कर्नाटक - भाजपसाठी प्रवेशद्वार आहे असे मानले जाते. गेल्या निवडणूकीत कर्नाटकमध्ये २८ पैकी १७ जागा मिळाल्या होत्या. पण या जागा टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. विधानसभेच्या निवडणूकीत भाजपला सत्ता मिळवता आली नाही. काँग्रेस व धजद आघाडीचे सरकार येथे आहे. येडियुराप्पा यांना संधी दाखवण्याची ही शेवटची संधी आहे. यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. या निवडणूकीत काँग्रेस-धजद आघाडीच्या जागा वाढण्याची शक्यता येथे दिसत आहे. 

आंध्रप्रदेश - गेल्या निवडणूकीपुर्वी आंध्रचे विभाजन काँग्रेसने केले. याचा फायदा काँग्रेसला होईल असे वाटले होते पण तेलंगणामध्ये काँग्रेसला विभाजनाचा फायदा फारसा घेता आला नाही. विभाजनानंतर आता आंध्रप्रदेश २५ जागा तर तेलंगणामध्ये १७ जागा आहेत. येथे मात्र स्थानिक पक्षांना अधिक जागा मिळतील असे चित्र आहे, पण हे पक्ष निवडणूक निकालानंतर कोठे जातील हे सांगता येत नाही. काँग्रेस आणि भाजपला मात्र येथे फारसे यश मिळेल असे वाटत नाही. 

तमिळनाडू - मागची निवडणूक जयललितांनी एकतर्फी जिंकली होती. मोदींची लाट फारशी येथे नाही. गेल्या निवडणूकीत टुजी घोटाळ्याचा फटका युपीएला बसला होता. जयललिता आणि करुणानिधी निधनानंतर तमिळनाडूमध्ये भाजपने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. निर्माण झालेल्या राजकिय पोकळीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. द्रमुक सोबत काँग्रेस आहे तर अण्णा द्रुमुदसोबत भाजप आहे. पण लढत द्रमुक-अण्णा द्रमुक यांच्यातच होईल. स्टॅलिन यांचा या निवडणूकीत चांगला प्रभाव दिसून येईल अशी शक्यता आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होईल.  

केरळ - केरळमध्ये २० जागा आहेत. यामध्ये भाजपला एक-दोन जागा मिळतील. भाजपला येथे मते वाढत आहेत पण याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. त्यामुळे डाव्याच्या जागा घटतील असे चित्र आहे. काँग्रेसला येथे चांगल्या जागा मिळतील असे चित्र आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com