Loksabha 2019 : गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या भीतीने मतदानकेंद्र हलविले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

जिल्ह्यातील कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांच्या भीतीनं अनेक केंद्र हलवण्यात आले. यामुळं मतदारांची मोठी धावपळ झाली. यातच सावली येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र सुरक्षेच्या कारणावरून एका लग्न मंडपात हलवण्यात आलं.

गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात नक्षलवाद्यांच्या भीतीनं अनेक केंद्र हलवण्यात आले. यामुळं मतदारांची मोठी धावपळ झाली. यातच सावली येथील जिल्हा परिषद शाळेतील केंद्र सुरक्षेच्या कारणावरून एका लग्न मंडपात हलवण्यात आलं. यापूर्वीच्या सर्व निवडणुका याच शाळेत झाल्या असताना यावेळी लग्न मंडपात मतदान का घेतलं, हे कोडंच आहे. आणि उघड्या मंडपात कोणती सुरक्षा होती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नक्षलवाद्यांनी गडचिरोली मधील चिरोली येथील अति दुर्गम कसनसून पोलिस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ आज सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास लावलेला भूसुरुंग घडावून आणला. यात कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, 
या केंद्रावर मतदान सुरु असतांना अचानक स्फोट झाला. यामुळे तेथे उपस्थीत मतदार व तैनात असलेल्या पोलिस जवानात एकच खळबळ उडाली.  नक्षलग्रस्त भागात चौकस सुरक्षा असतानाही स्फोट घडणून आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कालही गट्टा गावात नक्षलवाद्यांनी घाडणून आणलेल्या स्फोटात दोन जवान जखमी झाले होते.
 

Web Title: polling booth place change because of naxalite