Loksabha 2019 : Loksabha 2019 : प्रवीण गायकवाड यांच्या हातात काँग्रेसचा 'हात'; पुण्यातून उमेदवारी?

Loksabha 2019 : Loksabha 2019 : प्रवीण गायकवाड यांच्या हातात काँग्रेसचा 'हात'; पुण्यातून उमेदवारी?

पुणे : संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्यक्ष आणि शेकापचे नेते प्रवीण गायकवाड हे उद्या (शनिवारी) सकाळी दहा वाजता मुंबईत काॅंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याने गायकवाड समर्थकांच्या पुण्यासाठी उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.

पुणे लोकसभेसाठी काॅंग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याचे भलताच पेच निर्माण झाला आहे. गायकवाड हे स्पर्धेत होते. मात्र त्यांच्या नावाला स्थानिक निष्ठावंतांनी विरोध केल्याने गायकवाड यांनीच मला आता काॅंग्रेसचे तिकिट नको, अशी भूमिका घेतली होती.
दुसरीकडे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला काॅंग्रेसने पायघड्या घातल्या आणि उत्तर मुंबईची उमेदवारीही दिली. त्यावर गायकवाड यांनी टीका करत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची काॅंग्रेस अवहेलना करत असल्याचा टोला लगावला होता. यानंतर सोशल मीडियातही त्याचे पडसाद उमटले. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते हे गायकवाडांना उमेदवारी न देऊन भाजपविरोधात लुटुपुटुची लढाई लढत असल्याचे मेसेज व्हायरल झाले. त्याची दखल दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली.

याबाबत गायकवाड यांनी आपण संविधानाच्या रक्षणासाठी काॅंग्रेससोबतच जाणार असल्याचे सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीत भाजपचा मार्ग आपल्याला निषिद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला काॅंग्रेसने संधी दिली तर हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर यांच्याप्रमाणे महाराष्ट्रात भाजपविरोधात वादळ निर्माण होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला होता.

तसेच माझ्या प्रवेशाची पायवाट तयार झाल्यानंतर अनेक पुरोगामी मंडळी काॅंग्रेसकडे वळू शकतात, असाही दावा केला होता. या साऱ्या घडामोडींनंतर प्रदेश प्रभारी खर्गे यांच्या उपस्थितीतच प्रवेश होत असल्याने गायकवाड यांचा पुन्हा उमेदवारीसाठी विचार होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com