Loksabha 2019 : केंद्रीयमंत्री म्हणतात, 'साध्वी प्रज्ञासिंह संत तर मी मूर्ख प्राणी'

वृत्तसंस्था
Sunday, 28 April 2019

- माझी तुलना प्रज्ञासिंह यांच्याशी करू नका.

नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी स्वत:ला मूर्ख प्राणी म्हटले असून, माझी तुलना प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याशी करू नका, असेही सांगितले.    

मध्य प्रदेशच्या राजकारणात तुमची जागा आता साध्वी प्रज्ञासिंह घेणार का?, असा प्रश्न उमा भारती यांना पत्रकारांनी विचारला होता. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी प्रज्ञासिंह यांचे कौतुक केले. त्यामध्ये त्या म्हणाल्या, ''साध्वी प्रज्ञासिंह महान संत आहेत. त्यांच्याशी माझी तुलना करू नका. मी अगदीच सर्वसाधारण व्यक्ती आणि मूर्ख प्राणी आहे''. 

दरम्यान, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपकडून भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याने त्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या होत्या. त्यानंतर आता उमा भारती यांनी हे विधान केल्याने नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Singh is a great saint I am foolish creature says Uma Bharti