Loksabha 2019 : प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक आयोगाची नोटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 20 एप्रिल 2019

- हुतात्मा पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केले होते अवमानकारक विधान.

भोपाळ : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत अवमानकारक विधाने करणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर यांना निवडणूक आयोग नोटीस जारी केली आहे. एका अधिकाऱ्याने आज ही माहिती दिली.

प्रज्ञासिंह या भाजपच्या भोपाळच्या लोकसभा उमेदवार असून, काल त्यांनी करकरे यांच्याविरुद्ध अवमानकारक भाषा वापरली आणि त्यावरून टीकेचा भडिमार झाल्यावर त्यांनी माफी मागितली होती. आम्ही या विधानाची दखल घेतली असून, सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. तो आज सकाळी मिळाला.

आम्ही कार्यक्रमाचे संयोजक आणि हे विधान करणाऱ्या व्यक्तीला (प्रज्ञासिंह) यांना नोटीस देणार असून, त्याचे उत्तर 24 तासांत त्यांना द्यावे लागेल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि भोपाळचे जिल्हाधिकारी सुदाम खाडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Thakur gets show cause notice from Bhopal poll official for derogatory remarks against Hemant Karkare