LokSabha2019 : लातुरात पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी 

हरी तुगावकर
गुरुवार, 4 एप्रिल 2019

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार आदी नेत्यांच्या सभाही जिल्ह्यात होणार आहेत. 

लातूर : लातूर व उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ता. 8 एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी 9.30 वाजता औसा येथे जाहिर सभा होणार आहे. याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे दिली.

भारतीय जनता पक्षाचे लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे व शिवसेनेचे उस्मानाबादचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ ही जाहिर सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. या सभेला दोन्ही जिल्ह्यातील लाखोचा जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. त्या दृष्टीने सभेची जय्यत तयारी सुरु आहे.

यासोबतच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार आहेत. तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार आदी नेत्यांच्या सभाही जिल्ह्यात होणार आहेत. असेही निलंगेकर यांनी सांगितले.

दरम्यान मोदी यांच्या सभेसाठी व्यासपीठ उभारणीचे भूमिपूजन गुरूवारी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, लातूर लोकसभा प्रभारी अ‍ॅड. मिलींद पाटील, रमेश कराड, किरण उटगे, युवा मोर्चाच्या प्रदेश चिटणीस प्रेरणा होनराव, अ‍ॅड. मुक्तेश्‍वर वागदरे, अ‍ॅड. दिग्वीजय काथवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक उपस्थित होते.

Web Title: Preparation in Latur for PM Modis Rally