Loksabha 2019 : पंतप्रधान मोदी म्हणजे जल्लाद : राबडीदेवी

पीटीआय
बुधवार, 8 मे 2019

-  "प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दुर्योधन म्हणत चूक केली आहे, ते जल्लाद आहेत जल्लाद''. 

पाटणा : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काल (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना दुर्योधनाबरोबर केली होती. त्यासंदर्भात बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, "प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दुर्योधन म्हणत चूक केली आहे, ते जल्लाद आहेत जल्लाद'. 

राजदचे सर्वोसर्वा आणि राबडीदेवी यांचे पती लालूप्रसाद यादव यांनीही नरेंद्र मोदींना 2014 मध्ये जल्लाद म्हटले होते. "नरेंद्र मोदी कुठेही गेले, त्यांनी काहीही केले, तर एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की ते जल्लाद, जल्लाद आणि जल्लादच आहेत,' या शब्दांत लालूप्रसाद यांनी टीका केली होती. त्यानंतर आता राबडीदेवी यांनी ही टीका केली.

दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली होती. "देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही. इतिहास याची साक्ष देतो. दुर्योधनाचा अहंकारही असाच गळून पडला होता,' असे त्या काल अंबालातील सभेत म्हणाल्या होत्या. त्यावर, "कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे 23 मे रोजी समजेल,' असे प्रत्युत्तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पश्‍चिम बंगालमधील विष्णूपूर येथील सभेत दिले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Modi is hangman says Rabri Devi