Loksabha 2019 : 'पंतप्रधान मोदी नवविवाहितेसारखे'

वृत्तसंस्था
Saturday, 11 May 2019

- नरेंद्र मोदी भारताचे विभाजन प्रमुख

- मोदी खोटं बोलणाऱ्यांचे प्रमुख. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नवविवाहितेशी केले. ''मोदीजी, हे नवविवाहितेसारखे आहेत. जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करते'', असे सिद्धू म्हणाले.

मध्य प्रदेशातील इंदूर येथे नवज्योतसिंग सिद्धू बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, नरेंद्र मोदी भारताचे विभाजन प्रमुख आहेत. ते खोटं बोलणाऱ्यांचे प्रमुख आहेत. इतकेच नाही तर ते अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचे व्यवसाय व्यवस्थापकही आहेत.

तसेच सिद्धू यांनी मोदींची तुलना नवविवाहितेशी केली. ते म्हणाले, जी फक्त बांगड्यांचा आवाज करते आणि त्यामुळे गल्लीतील बाकीच्या लोकांना वाटते की ती खूप काम करते. मोदी सरकार फक्त दिखावा करत आहे. मात्र, प्रत्यक्षात काहीच काम केले जात नाही. मागील पाच वर्षांत मोदी सरकारच्या काळातही अशाच प्रकारे सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Modi is like a new Bride says Navjot Singh Sidhu