Loksabha 2019 : प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या उपनेत्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 April 2019

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची नियुक्‍ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी केली आहे. 

मुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची नियुक्‍ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी केली आहे. 

प्रियांका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या आठ पदाधिकाऱ्यांना पुन्हा कॉंग्रेसमध्ये घेण्यात आले. त्यामुळे त्या नाराज होत्या. ट्‌विटरवरून त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश दिला. त्यांच्या रूपाने आपल्याला चांगली बहीण मिळाली असून, त्यांच्या बुद्धीचा देशाला आणि महाराष्ट्रास उपयोग होईल. त्यांच्यावर मोठी जबाबदारी देऊ, असे उद्धव यांनी जाहीर केले होते.

मुंबई ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी असून, लहानपणापासूनच मला शिवसेनेविषयी आत्मीयता आहे, असे प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या होत्या. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Chaturvedi elected as Dy Leader of Shivsena