Loksabha 2019 : आढळरावांच्या संपत्तीत पावणेचार कोटींची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियाकडे 29 कोटी एक लाख 65 हजार 511 रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे.

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कुटुंबियाकडे 29 कोटी एक लाख 65 हजार 511 रुपयांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे. मागील कसभा निवडणुकीच्या तुलनेत
त्यांच्या कुटुंबियाच्या मालमत्तेत तीन कोटी 62 लाख 85 हजार 36 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान आढळराव यांच्या कुटुंबियांकडे चार कोटी 98 लाख 98 हजार 166 रुपयांचे कर्ज आहे. कर्जात मात्र गतवेळच्या तुलनेत 1 कोटी 17 लाख 12 हजार 700 रुपयांनी घट झाल्याचे आढळराव यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे.

खासदार आढळराव यांच्या कुटुंबियांकडे मागील लोकसभा निवडणुकीत (2014) एकूण 25 कोटी 38 लाख 80 हजार 475 रुपयांची मालमत्ता होती. शिवाय त्यांच्याकडे विविध बॅंकांचे मिळून सहा कोटी 16 लाख 10 हजार 866 रुपयांचे कर्ज होते.
गेल्या पाच वर्षात त्यांनी सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. जंगम मालमत्तेत रोकड, सोने-चांदी, बंधपत्रे, ऋणपत्रे, विमापत्रे आणि शेअर्सचा तर, स्थावर मालमत्तेत शेतजमीन, बिगर शेती जमीन, गाळे, सदनिका आणि लांडेवाडीतील बंगल्यांचा समावेश आहे.

आढळराव यांच्याकडे रोख 17 हजार 308 रुपये, पत्नी कल्पना यांच्याकडे 1 लाख 75 हजार 6 रुपये रोख आहेत. स्वतः आढळराव यांच्या नावावर एक बोलेरो गाडी असल्याचे आणि
सोने-चांदीचा एकही एकही मौल्यवान दागिना नाही. पत्नी कल्पना यांच्याकडे मात्र एक हजार 513 ग्रॅम (दीड किलोहून अधिक) सोने, तीन किलो चांदी आणि हिऱ्याचे मौल्यवान दागिने असल्याचे नमूद केले आहे.

Web Title: Property of Shivajirao Adhalrao Patil have increased by 3 Crores and 75 Lakhs