Loksabha 2019 : पुण्यात अकरापर्यंत 12.66 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- पुणे शहरात सकाळी मतदानाला उत्साहात सुरवात

- पहिल्या दोन तासात 12 ते 15 टक्के मतदान 

- शहरात एकूण 21 लाख मतदार

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी शहरात उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला असून, सकाळी 11 पर्यंत 12.66 टक्के मतदान झाल्याचे समजते. शहरात सुमारे 21 लाख मतदार असून 1944 बूथवर ते मतदान करतील. 

सकाळी अकरापर्यंत पुण्यातील वडगावशेरी मतदारसंघात 10.8 टक्के, शिवाजीनगर मतदारसंघात 12.28 टक्के, कोथरुड  मतदारसंघात 17.05 टक्के, पर्वती  मतदारसंघात 11.2 टक्के पुणे कॅन्टोंमेंट मतदारसंघात 12.06टक्के, कसबा मतदारसंघात 12.23 टक्के इतके मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्वात जास्त मतदानाची नोंद कसब्यात दिसत असून त्यापाठोपाठ शिवाजीनगरमध्ये दिसत आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद वडगाव शेरी मतदार संघात दिसत आहे. दरम्यान गिरीष बापट आणि मोहन जोशी उमेदवार असल्यामुळे मतदानाचा जोर असाच कायम राहिल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी शनिवार पेठेत तर काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी महर्षीनगरमध्ये सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. उन्हाचा वाढणारा तडाखा लक्षात घेऊन अनेक मतदारांनी सकाळीच मतदान करण्यास पसंती दिली तर मॉर्निग वॉक करणाऱ्यांनाही मतदान करूनच घरी जाणे पसंत केले. शहरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

 नोकरदार वर्गाने आणि वयस्कर मंडळींनी सकाळच्या सत्रातच मतदानाचा हक्क बजावणे पसंत केले
 

Web Title: Pune receives 12.66 percent voting till 11.00 am