Loksabha 2019 : अंबानींच्या घराबाहेरील चौकीदारांच्या रांगेत नरेंद्र मोदी पहिले : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मे 2019

- भारतातील दुकानदार, शेतकरी आणि तरुण यांचे एक रुपयाचे कर्जमाफ केले नाही.

जयपूर : 'चौकीदारा'च्या मुद्दावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. येथील जाहीरसभेत ते म्हणाले, तुम्ही कधी एखादा कामगार, शेतकरी किंवा बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर चौकीदाराला पाहिले का? अनिल अंबानींच्या घराजवळ किती चौकीदार आहेत? तिथे चौकीदारांची रांग लागली आहे. याच रांगेत मोदीजी सर्वांत पहिले आहेत.  

जयपूर येथे आयोजित प्रचारसभेत राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, चौकीदाराने चोरी केली असून, भारताच्या हवाई दलाकडून 30 हजार कोटींची चोरी केली आणि अनिल अंबानी यांना दिले. त्यानंतर आणखी एक चोरी झाली, ती म्हणजे 15 लोकांचे पाच लाख 55 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र, भारतातील दुकानदार, शेतकरी आणि तरुण यांचे एक रुपयाचे कर्ज माफ केले नाही. पण 15 लोकांचे कर्ज माफ केले, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Queue of Chowkidars And Modiji Is Standing First in Queue Says Rahul Gandhi