Rafale Deal : राहुल गांधींकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान

वृत्तसंस्था
बुधवार, 10 एप्रिल 2019

- ‘चौकीदार चोर हैं’ हे वाक्य न्यायालयाच्या तोंडी घालणे हा अवमान. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राफेल करारातील पुराव्याच्या कागदपत्रांवर आक्षेप घेतला होता. हा आक्षेप सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) फेटाळला. त्यानंतर आता संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी राहुल गांधी यांच्याकडून न्यायालयाचा अवमान झाला, असे सांगत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा आक्षेप फेटाळला. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर हल्लाबोल चढवला. राहुल गांधींनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांच्या टीकेनंतर सरकारची बाजू मांडण्यासाठी निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सीतारमन यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

त्या म्हणाल्या, अनिल अंबानी यांनी पंतप्रधान मोदींना पैसे दिले असे न्यायालयाने सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले. यात काहीही तथ्य नाही. हे साफ खोटे आहे. राहुल गांधींनी केलेले वक्तव्य हा न्यायालयाचा अवमान आहे. तसेच ‘चौकीदार चोर हैं’ हे वाक्य न्यायालयाच्या तोंडी घालणे हादेखील एक अवमान आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi contempt Supreme Court says Nirmala Sitharaman