RahulWithSakal : काँग्रेसची विचारधारा ही भारताची विचारधारा : राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली.

प्रश्‍न : नरेंद्र मोदी यांची एक विचारधारा आहे. इंदिरा गांधींची विचारधारा काँग्रेस पुढे नेत आहे. तुमच्यावर तुमच्या आजींच्या (इंदिरा गांधी यांचा) विचारांचा मोठा प्रभाव आहे. या विचारधारांकडे तुम्ही कसे पाहता?

उत्तर : प्रश्‍न राहुल गांधीच्या किंवा इंदीरा गांधींच्या विचारधारेचा नाही. काँग्रेसची विचारधारा ही भारताची विचारधारा आहे. 

प्रश्‍न : काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि देशाची विचारधारा एकच आहे, असे आपणास म्हणायचे आहे का?

उत्तर : एखादी व्यक्ती म्हणजे लोकांच्या आवाजाचे प्रतिबिंब असते. भारताचा विचार करताना कृपया इतिहास लक्षात घ्या; विनय, आदर आणि प्रेमाने पाहा. ही या देशाची पूर्वपीठिका आहे. मी गीता, उपनिषदे आणि वेद वाचले आहेत, पूर्ण नाही, पण बऱ्यापैकी वाचले आहेत. दुबळ्यांचे जीव घ्या किंवा तुमच्या गुरूचा अपमान करा किंवा लोकांचा तिरस्कार करा, त्यांच्याबरोबर कठोरपणे वागा, असे मी त्यात कुठेही वाचले नाही.

सर्वांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्व. इतरांच्या कल्पना ऐकणे. तुम्हाला इतरांच्या कल्पना पटत नसतील तरी त्यांच्याबद्दल मोकळेपणाने विचार करणे म्हणजे हिंदुत्व. हिंदुत्व म्हणजे इंदिरा गांधी किंवा राहुल गांधी नव्हे. आपण कोणीच नाही. हा भारताचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्याने भारत या कल्पनेला आकार दिला आहे. भारत मुळातच विनयशील आहे. यशस्वी झालेले आपले सगळे नेते पाहा, तुम्हाला हजारो वर्षांची परंपरा दिसेल. सम्राट अशोक असतील किंवा महात्मा गांधी असतील. भारतातल्या नेत्याकडे असणारा एकमेव मोठा सद्‌गुण म्हणजे त्याची विनयशीलता आणि लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याची तयारी. हे भारताचे नेतृत्व आहे. हा मुद्दा इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी, राहुल गांधी किंवा कोण्या एका नेत्यापुरता मर्यादित नाहीये. तो संपूर्ण भारतातल्या लोकांशी संबंधित आहे.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi opens up about ideology in an exclusive interview with Abhijit Pawar