RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल गांधी

शनिवार, 18 मे 2019

काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. 

प्रश्‍न : जे भाजपचे मतदार नाहीत, पण ज्यांनी २०१४ मध्ये ‘मोदी सरकार’साठी मतदान केले, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना तुम्ही आपल्याकडे पुन्हा कसे वळवणार?

उत्तर : मोदींनी आधीच आमच्यासाठी हे काम केले आहे, खरं तर मोदींना खूप संधी होत्या. मी पुन्हा सांगतो, आजमितीला भारत तीन प्रमुख समस्यांना तोंड देत आहे. येथे शेतकऱ्यांचे प्रश्‍न आहेत, रोजगाराची समस्या आहे, आर्थिक पेच आहेत. हे तिन्हीही एकमेकांत गुंतलेले आहेत. ज्या पंतप्रधानांनी पदावर पाच वर्षे काढताना केवळ टोलवाटोलवीच केली, या समस्यांवर तोडगाच काढला नाही, त्यांनी विचार करावा, हे का घडले? गेल्या ४५ वर्षांत आपल्याकडे रोजगार का घटला? याचे तरी जनतेला उत्तर द्यावे. छोट्या आणि मध्यम व्यावसायिकांची वाढ का खुंटली? देशात एकमेकांविरोधात एवढे टोकाचे ध्रुवीकरण का झाले? जम्मू-काश्‍मीरमध्ये लोक एवढ्या मोठ्या संख्येने मृत्युमुखी का पडत आहेत, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी द्यावीत.

राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

RahulWithSakal : काँग्रेसच देईल गरिबांना ‘न्याय’ (राहुल गांधींची मुलाखत)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची Exclusive मुलाखत वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

ModiWithSakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा! (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीवर घणाघाती टीका करत आहेत. काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा, जीएसटी, काश्‍मीर, राष्ट्रवादाचा मुद्दा, हिंदुत्व अशा अनेक विषयांवर राहुल गांधी यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मनमोकळी बातचीत केली. काँग्रेसची धोरणे, पुढची वाटचाल याविषयी बोलताना काँग्रेसच गरिबांना ‘न्याय’ देईल, यावर गांधी यांनी भर दिला.