Loksabha 2019 : 'काँग्रेस काम करतं अन् भाजप फक्त आश्वासनं देतं'

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 एप्रिल 2019

- काँग्रेसने आणलेली 'न्याय' योजना तज्ज्ञांशी विचार करून मांडली

-  काँग्रेस काम करते आणि भाजपकडून फक्त आश्वासने दिली जातात

नागपूर : काँग्रेसने आणलेली 'न्याय' योजना तज्ज्ञांशी विचार करून मांडली आहे. त्यामुळे ही न्याय योजना देशातील गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. तसेच काँग्रेस काम करते आणि भाजपकडून फक्त आश्वासने दिली जातात, असेही ते म्हणाले.

नागपूर येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा राफेल करार गेला तुम्ही तेव्हा कुठं होता. कधीतरी खोट्याच पितळं उघडं पडतच. मी माशाचा डोळा पाहिलाय, आता अचूक बाण मारणारच. काँग्रेसने गरिबांसाठी आणलेली न्याय योजनेच्या माध्यमातून गरिबांना 72 हजार रुपये मिळणार आहेत. आम्ही 'न्याय'साठी एक पैसाही कमी पडू देणार नाही. काँग्रेस काम करत आणि भाजप फक्त आश्वासन देते. गरिबीवर हा काँग्रेसचा सर्जिकल स्ट्राईक आहे. तसेच अनिल अंबानी तुरुंगात जाणार होते. तेव्हा त्यांना त्यांचे भाऊ मुकेश अंबानी यांनी वाचविले. त्यांच्यावर 45 हजार कोटींचे कर्ज आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि मित्र पक्षांनी मिळून कर्जमाफीसाठी
दबाव टाकला होता. मात्र, त्यानंतर मोदी सरकारने नोटाबंदी करून 'गब्बर सिंग टॅक्स' लागू केला, असेही ते म्हणाले.

Web Title: Rahul Gandhi slams BJP on being careless about citizens of Country