LokSabha 2019 : 'राहुल गांधी फट्टू है'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मार्च 2019

पुणे : देशभरातील चौकीदारांनी ट्विटरवरून #RahulGandhiFattuHai आणि #FattuPappu या दोन हॅशटॅग खाली काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना ट्रोल करण्यास सुरवात केली आहे. आज सकाळपासून या दोन हॅशटॅगचा ट्रेन्ड सुरु आहे. राहुल गांधी अमेठी सोबतच केरळ मधील वायनाड मधूनही लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरु असताना यावरूनच त्यांना ट्रोल केले जात आहे.

उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघात जिथे राहुल गांधी यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लढत होणार आहे. त्या बाबींवर लक्ष केंद्रीत करुन स्मृती इराणी यांच्या बाजून अमेठी मतदारसंघावरुन राहुल गांधी यांना लक्ष केले जात आहे. राहुल गांधी यांची विविध भाष्य, व्हिडिओ, छायाचित्रांचा वापर करून त्यांना ट्रोल केले जात आहे. ट्रोल करणाऱ्यांमधील समान धागा म्हणेज हे सर्व मोदींनी सुरु केलेल्या चौकीदार मोहीमेचे सदस्य आहेत.

अमेठी मधून राहुल गांधी लढायला घाबरत आहेत. स्मृती इराणीच येथून विजयी होणार आहेत. राहुल गांधी लढण्याआधीच पराभव स्विकारला आहे. अशा प्रकारेच हजारो ट्विट सध्या ट्विटवरून सरु आहेत.

असे हजारो मेसेस ट्विटरवरून सुरु आहेत. 

Web Title: Rahul Gandhi troll on Twitter