Loksabha 2019 : सरकार स्थापनेसाठी राहुल गांधींची भूमिका महत्त्वाची

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

- केंद्रातील नवे सरकार स्थापन होण्यासाठी राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील, असे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच 'अच्छे दिन'च्या आश्वासनांवर कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नये, यासाठी भाजपकडून अत्यंत द्वेषाचे राजकारण केले जात आहे, असेही ते म्हणाले.
 
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यादव बोलत होते. ते म्हणाले, केंद्रातील नवे सरकार स्थापन होण्यासाठी राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची असेल. सध्या भाजपकडून 2014 च्या निवडणुकांपूर्वी दिलेल्या आश्वासनांवर भाष्य केले जात नाही. त्यामुळेच आता त्यांच्याकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi will play central role in government formation says Tejashwi Yadav