Loksabha 2019 : मोदी-शहा देशासाठी कलंक : राज ठाकरे

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मोदींचे काम हिटलरसारखं 

पंतप्रधान मोदी आता ज्याप्रकारे काम करत आहेत तसाच प्रकार 1932 मध्ये अॅडॉल्फ हिटरलकडून केला जात होता. मोदींचे काम हिटलरसारखं आहे.

इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील पत्रकारांसमोर जायला घाबरतात. ते देशाला उत्तर द्यायला घाबरत आहेत. ते साधं देशाला उत्तर द्यायला बांधिलही नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे देशासाठी कलंक आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) निशाणा साधला.

इचलकरंजी येथे आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले, मोदींच्या कार्यकाळातच अनेक जवान हुतात्मा झाले आहेत. शरीफांना केक भरताय आणि त्यांच्याकडची बिर्याणी खाताय? इतका खोटारडा माणूस कधीही पाहिला नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा देशाला कलंक आहेत. देशातील लोकशाही त्यांना संपवायची आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँकेबाबत हालचाली केल्या गेल्या.

मोदींचे काम हिटलरसारखं 

पंतप्रधान मोदी आता ज्याप्रकारे काम करत आहेत तसाच प्रकार 1932 मध्ये अॅडॉल्फ हिटरलकडून केला जात होता. मोदींचे काम हिटलरसारखं आहे.

2014 चे स्वप्न होतं ते विसरून जा 

पंतप्रधान मोदींना आपण 2014 मध्ये निवडून दिले त्यांना मतं दिले. ते एकप्रकारचे स्वप्न होतं आणि विसरून जा. पण आता त्यांना मतं देऊ नका.

Web Title: Raj Thackeray Criticizes Narendra Modi and Amit Shah