Loksabha 2019 : भाजप आयटी सेलची राज ठाकरेंकडून पोलखोल

Loksabha 2019 : भाजप आयटी सेलची राज ठाकरेंकडून पोलखोल

मुंबई : भाजपच्या आयटी सेलने मोदी है तो मुमकीन है असे फेसबुकवर पेज सुरु केले आणि घर मिळालेल्या कुटुंबाचा फोटो मोदींबरोबर लावला. याच कुटुंबाला राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावून त्यांना काय मिळाले नाही, याची पोलखोल केली.

राज यांनी पोलखोलीनंतर टीका करताना म्हणाले, की भाजपच्या आयटी सेलमधील लावारिस कार्टी खोटा प्रचार करत आहेत. भाजपने खोटेपणाचे आकडे सांगत, बाता मारत देशाची पाच वर्षे वाया घालविली. मेक इन इंडियाबाबत यांनी सगळे खोटे पसरविले. आपल्या देशात विमान बनविणारा अमोल यादवला नुसते झुलवत ठेवले. त्यामुळे तो परदेशात निघाला आहे. मेक इन इंडियाचे बुजगावणे उभे केले, नुसते करार केले, पण झाले काहीच नाही.  

राज ठाकरे यांनी यापूर्वी देशातील पहिले डीजिटल गाव म्हणून असलेल्या हरिसालमधील परिस्थितीची पोलखोल केली होती. लाभार्थी असलेल्या तरुणाला स्टेजवर आणून त्याला काही मिळाले नसल्याचे सांगितल्यानंतर महाराष्ट्रभर खळबळ उडाली होती. आता घर मिळाले असे सांगणाऱ्या कुटुंबालाच त्यांनी स्टेजवर आणून भाजपची पोलखोल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com