Loksabha 2019 : प्रचारासाठी राज ठाकरेंना मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकेकाळच्या विरोधकांकडून प्रचारासाठी मोठी मागणी होत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकेकाळच्या विरोधकांकडून प्रचारासाठी मोठी मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्यासह युती आणि आघाडीच्या मित्र पक्षांचे नेते प्रचारापासून बाजूला पडल्याचे चित्र आहे.

राज ठाकरे राज्यात सात ते आठ सभा घेणार असल्याची चर्चा आहे. शनिवारी (ता. 6) मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार असून, त्यात राज ठाकरे सभांबाबतचा तपशील जाहीर करणार असल्याचे समजते. कॉंग्रेसकडून राहुल गांधी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शरद पवार यांच्यासह अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या सभांचा धडाका सुरू आहे.

युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या सभा सुरू आहेत. मात्र, त्यांच्या मित्रपक्षांचे रामदास आठवलेवगळून महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: Raj Thackeray's demand for Election Campaign