...अन्‌ सुरू झाला शिवसेनेचा झंझावात

शिवप्रसाद देसाई
रविवार, 10 मार्च 2019

राजापूर आणि रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात १९९६ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा अमल सुरू झाला. सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी लोकसभेत प्रवेश मिळवून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. या निवडणुकीपासून दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली. 

राजापूर आणि रत्नागिरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात १९९६ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेचा अमल सुरू झाला. सुरेश प्रभू आणि अनंत गीते यांनी लोकसभेत प्रवेश मिळवून राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला. या निवडणुकीपासून दोन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची मालिकाच सुरू झाली. 

शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाची झलक १९९१ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांवरून दिसत होती. शिवसेनाप्रमुखांनी कोकणात संघटनावाढीसाठीची व्यूहरचना केली होती. शिवसेनेने युवावर्गाला प्रवाहात आणल्याने काँग्रेसकडील सत्तेच्या चाव्या हळूहळू निसटू लागल्या.

१९९६ ला लोकसभेची जागा जिंकून त्यांनी शिवसेनेच्या वैभवाचा कळस चढवला. यानंतर राजापुरात २००४ च्या निवडणुकीपर्यंत तर रत्नागिरीत निवडूण आलेल्या गीतेंनी आतापर्यंत (२००९ ला रायगड मतदारसंघातून) विजयाची परंपरा कायम राखली. 

अकराव्या लोकसभेसाठी १९९६ ला झालेल्या निवडणुकीत राजापुरातून काँग्रेसच्या सुधीर सावंतांना १२७४३०, जनता दलाच्या मधू दंडवतेंना ८२९३३, बशीर शेख १९०४, सुभाष शिरोडकर २४०४४, सुभाष हेरेकर २१८२, तर शिवसेनेच्या सुरेश प्रभूंना १,९३,५६६ मते मिळाली. या निवडणुकीत रत्नागिरीतून शिवसेनेने अनंत गीते (२,७५,१४४ मते विजयी), अपक्ष मेजर गोपिनाथ अहिरे (९७२८), काँग्रेसचे गोविंदराव निकम (१४३३३०), मंगला शिंदे (१४३०), अपक्ष गंगाराम शिंदे (४०४५), प्रभाकर केळकर (४६५०), प्रा. मोझम काझी (२९३०९), सुनील सुर्वे यांना (२३१७) मते मिळाली. 

बाराव्या लोकसभेसाठी १९९८ ला राजापुरातून अपक्ष पुष्पसेन सावंत (३६२८५), काँग्रेसचे मच्छिंद्र कांबळी (१,५२,७२४), अपक्ष किरण ठाकूर (७०३५), नलिनी भुवड (१८५२०) तर शिवसेनेचे विजयी उमेदवार सुरेश प्रभूंना २,१७,७६६ मते मिळाली.

या वेळी रत्नागिरीतून काँग्रेसचे निशिकांत ऊर्फ नाना जोशी (२०७६९४), अ. भा. सेनेचे किशोर सावंत (१२,९६२), अपक्ष सुजित झिमण (२०२५५), सुरेंद्र थत्ते (३९९३) यांचा शिवसेनेच्या अनंत गीतेंनी २३८९२८ मते मिळवून पराभव केला. 

तेराव्या लोकसभेसाठी १९९९ ला झालेल्या निवडणुकीत राजापुरातून जनता दलातर्फे (सेक्‍युलर) प्रा. मधू दंडवडे (१०८६७३), काँग्रेसचे सुधीर सावंत (१०३५५६) यांचा सुरेश प्रभूंनी २२१५२३ मते मिळवून पराभव केला. रत्नागिरीत काँग्रसचे राजाराम शिंदे (६२०२८), राष्ट्रवादीचे सुजित झिमण (१७८४९१) यांचा गीतेंनी २,९३,८३४ मते मिळवून पराभव केला.

चौदाव्या लोकसभेसाठी २००४ मध्ये जाहीर झालेल्या निवडणुकीत राजापुरातून काँग्रसचे सुधीर सावंत (१८३१०२), यांचा सुरेश प्रभूंनी २,६४००१ मते मिळवून पराभव केला. रत्नागिरीत काँग्रेसचे गोविंदराव निकम (१८५७२२) यांचा अनंत गीतेंनी ३,३४,६९० मते मिळवून पराभव केला.

Web Title: Rajapur and Ratnagiri Lok Sabha Constituency