Loksabha 2019 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांच्या विरोधात : सुप्रिया सुळे

प्रफुल्ल भंडारी 
बुधवार, 10 एप्रिल 2019

दौंड  (पुणे) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महिलांच्या विरोधात असून, मनुवाद हा भारतीय जनता पक्षाच्या विषयपत्रिकेवरील छुपा विषय आहे. असा दावा बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

दौंड शहरात आज (ता. ९) पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपनगराध्यक्ष राजेश जाधव यांच्यासह अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, अॅड. अजित बलदोटा, गुरूमुख नारंग, महेश भागवत, आदी यावेळी उपस्थित होते. 

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,``केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन बोलावून त्याला मंजूरी घेतली. परंतु, याच सरकारने महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी राज्यसभेत बहुमत नसल्याचे अतर्क्य कारण सांगत विधेयक प्रलंबित ठेवले आहे. मनुवादी वृत्तीने महिलांना विरोध होताना दिसतो. संघाचे महिलांसाठीचे धोरण खुले आणि पुरोगामी नाही. सरकारच्या 
महिलांविषयक कार्यक्रमांसाठी करण्यात आलेली तरतूद आणि प्रत्यक्षात खर्च होणारी रक्कम यात तफावत असून जाहिरातबाजीवर खर्च अधिक आहे.``

त्या पुढे म्हणाल्या,``नोटबंदी ही देशातील सर्वात मोठी आर्थिक आपत्ती ठरल्याने त्याविषयी पंतप्रधान बोलत नाहीत. जीएसटी आणि नोटबंदीचा उल्लेख प्रचारादरम्यान झाला तरी तो अंगलट येईल याची पूरेपूर खात्री असल्याने त्याचा उल्लेख पंतप्रधान टाळत आहेत.``

मोदी माझ्यावर टीका करूच शकत नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाढती बेरोजगारी, अडचणीतील शेती, दुष्काळ आणि विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्या (पवार कुटुंबीय) विरोधात बोलायला काहीच शिल्लक न राहिल्याने वैयक्तीक टीका करत आहेत. मी निष्क्रिय आहे अशा स्वरूपाची टीका ते करूच शकत नाहीत असेही सुळे म्हणाल्या.

Web Title: Rashtriya Swayamsevak Sangh against women says Supriya Sule