Raver Loksabha 2019 : सायंकाळी चारपर्यंत 44.91 मतदान

मंगळवार, 23 एप्रिल 2019

रावेर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 टक्के मतदान झाले.

रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात सकाळपर्यंतच्या टप्प्यात संथगतीने सुरु असणारे मतदान दुपारनंतर वाढले. रावेर विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 50.42 इतकी झाली आहे. 

या लोकसभा मतदारसंघात सायंकाळी चारपर्यंत 44.91 इतके मतदान झाले आहे. रावेर मतदारसंघातील भुसावळ विधानसभा मतदारसंघात 40.28 इतके मतदान झाले. या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी अशी - (सायंकाळ चारपर्यंतची) 

- भुसावळ 40.28 
- चोपडा 45.77
- जामनेर 44.22
- मलकापूर 50.17
- मुक्ताईनगर 39.10 
- रावेरमध्ये 50.42.