Loksabha 2019 : देशातील पहिल्या कॅशलेस गावाची पोलखोल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

'साम टिव्ही' ने केलेल्या विशेष रिपोर्ताजमध्ये सकरारच्या पहिल्या कॅशलेस गावाची पोलखोल.

धसई (मुरबाड) : देशातील पहिले कॅशलेस गाव म्हणून धसई गावाच्या अनेक घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आल्या होत्या. गावातील संपुर्ण व्यवहार कसे कॅशलेस सुरु आहेत, याच्या अनेक जाहिराती संपुर्ण देशात दाखविण्यात आल्याने गावाची संपुर्ण देशभर याची चर्चा झाली होती. परंतु, ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील जाहिरातीच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या या धसई गावाची वास्तव परिस्थिती परस्पर विरोधी आहे.

मोदी सरकारच्या विविध योजनांच्या जाहिरातींसाठी या गावाचा उपयोग करण्यात आला आहे. परंतु, त्या फक्त जाहिराती झाल्या प्रत्यक्षमात्र 1 टक्काही गाव कॅशलेस झाले नसल्याचे गावातील स्थानिक नागरिक सांगत आहेत.

'साम टिव्ही' ने केलेल्या विशेष रिपोर्ताजमध्ये सकरारच्या पहिल्या कॅशलेस गावाची पोलखोल करण्यात आली आहे. या गावात एक राष्ट्रीयकृत बँक आणि एक जिल्हा बँक असून अनेक लोकांचे बँक खाते सुद्धा नाही. त्यामुळे कॅशलेस व्यवहार करण्याचा संबंध येतो कुठे. 

धसई गावच्या बाजारातील संपुर्ण व्यवहार रोखीने सुरु असून, कुठेही कॅशलेस व्यवहार होताना दिसत नसल्याचे रिपोर्ताजमध्ये सांगण्यात आले आहे. गावातील स्थानिक नागरिकांना विचारले असता, नागरिकांना कॅशलेस म्हणजे काय? हे सुद्धा सांगता येत नाही. या गावातील संपुर्ण व्यवहार रोखीनेच होत असून 1 टक्काही गाव कॅशलेस झाले नसल्याचे नागरिक सांगत आहेत. राजकीय पक्षांनी केवळ जाहीरातीसाठी या गावाचा उपयोग करून त्यांचा राजकीय फायदा करून घेतला आहे. गावातील अनेक लोक मजूरीचे काम करतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक व्यवहार का रोखीनेच होत असतो. असे येथील स्थानिकांनी म्हणणे आहे.

Web Title: Reality Exposes of Indias First Cashless Village