Loksabha 2019 : सलामान खान विषयीच्या 'त्या' अफवांना पूर्णविराम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 मार्च 2019

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सलमान खान राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. तसेच तो निवडणूकीत कॅंपेन करणार असल्याच्याही अफवा होत्या. परंतु, या सगळ्या चर्चांना त्याने पूर्णविराम दिला आहे. त्याने याबाबत ट्विट करुन आपण राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सुमित्रा महाजन या इंदूरमधून सलग आठवेळा खासदार झालेल्या आहेत. त्यामुळे भाजपकडून ही जागा खेचून आणण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी यापूर्वी सलमान खानचे नाव सुचवले होते. तसेच नुकतेच त्याला मध्य प्रदेश पर्यटन विभागाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.

दरम्यान, काल सलमानने ट्विट करत आपण कोणत्याही प्रकारच्या निवडणूकीच्या कँपेनमध्ये सदभागी होणार नसल्याचे, तसेच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salman khan says not contesting lok sabha elections