LokSabha2019 : पवार कुटुंबाकडून मोदींच्या टिकेचा समाचार (व्हिडीओ)

Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule
Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील प्रचार सभेत पवार आणि गांधी कुटुंवार टिका केली होती. मोदींच्या या टिकेचा समाचार पवार कुटुंबातील स्वतः शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतला. 

शरद पवार म्हणाले "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार कुटुंबाची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काळजी करू नये. यासाठी आमचे लाखो कार्यकर्ते समर्थ आहेत. मोदींनी याची चिंता करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणा एकट्याचा नाही तर राज्य व देशातील लाखो कार्यकर्त्यांचा आहे. माझ्यावर पंचगंगेच्या पाण्यात वाढलेल्या आईचे उपकार आहेत. अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन कुटुंबार टिका करणाऱ्या मोदींकडून फारशा अपेक्षा ठेऊ नयेत.

अजित पवार म्हणाले, ''सव्वाशे कोटी जनतेचे पंतप्रधान अशा प्रकारे बोलतील हे कोणालाही वाटलं नव्हतं. तरुणांचे प्रश्न, बेकारी, महागाई, शेतीचे प्रश्न महिला, आदिवासी, भटके, कामगार प्रश्न देशात आहेत. पाच वर्षांपूर्वी ते विकासाचे मुद्दे बोलत होते, पण त्याला आता पूर्णपणे फाटा दिला आणि आमच्या घरावर उतरले. परिवाराचा प्रश्न आणि देशाच्या निवडणुकीच्या काय संबंध? ''माझ्याकडून नकळत एक वक्तव्य बोललं गेलं, ती माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती. हे मी सगळीकडे सांगितलं. आत्मक्लेश केला. चव्हाण साहेबांच्या समाधी जवळ प्रायश्चित्त घेतलं. तरी देखील तेच पुन्हा उकरून काढतात. त्याचा आणि निवडणुकीचा काय संबंध? मी माफी मागितली होती ना! हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का? तोही देशांच्या पंतप्रधानांकडून? मला काही कळत नाही, त्यांना कोणी ब्रिफिंग केलं. शरद पवार आमचे दैवत, दैवताच्या विरोधात कोणी काही करेल का? आम्ही आमचा पक्ष बघू ना !बाळासाहेब ठाकरे, उद्धवजी, अडवाणी, वाजपेयी, गडकरी यांनी पक्ष चालवले आम्ही काही बोललो का? कीव येते, हा शब्द वापरणे योग्य नाही. कारण पंतप्रधानपद मोठे आहे."

सुप्रिया सुळे म्हणाल्या "पंतप्रधान मोदींची टिका हास्यास्पद आहे...प्रधानमंत्री देशाचे असतात पक्षाचे नसतात. देशाबद्दल, रोजगारी, बेरोजगारी, विकासाबद्दल, लोकांच्या समस्यांबद्दल बोलणे गरजेचे होते. पण जोपर्यंत पवारांवर टिका होत नाही तोपर्यंत हेडलाईन होत नाही. महाराष्ट्राच्या राजकिय संस्कृतीमध्ये वयक्तीक टिका कुणी केली नाही. कुठल्या कुटुंबार टिका करण्याची संस्कृती आमची नाही. तुम्ही दिलेल्या आश्वासनांचे काय झाले. मुख्य विषय सोडून नको त्या गोष्टींवर त्यांचे भाषण झाले. याचा अर्थ त्यांच्याकडे ठोस काही सांगण्यासारखे नसल्यामुळे अशी विधाने केली जात आहेत. आम्ही कधीही कुठल्याही कुटुंबावर अशी टिका केली नाही. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com