Loksabha 2019 : शत्रुघ्न सिन्हा यांना काँग्रेसकडून पाटणा साहिबची उमेदवारी

वृत्तसंस्था
शनिवार, 6 एप्रिल 2019

शत्रुघ्न सिन्हा यांचा सामना रविशंकर प्रसाद यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये नुकताच पक्षप्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा यांना बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून विद्यमान कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे आता शत्रुघ्न सिन्हा यांचा सामना रविशंकर प्रसाद यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती. त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांना बिहारच्या पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपकडून रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी मिळाली. आता रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. 

दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, भाजप म्हणजे 'वन मॅन शो', 'टू मॅन आर्मी' आहे.

Web Title: Shatrughan Sinha Contest Loksabha Election Patna Sahib From Congress