Loksabha 2019 : शिवसेना-भाजप मनाने कधीही दूर नव्हते : मुख्यमंत्री

Loksabha 2019 : शिवसेना-भाजप मनाने कधीही दूर नव्हते : मुख्यमंत्री

औरंगाबाद : शिवसेना-भाजप मध्यंतरी परिस्थितीने थोडे वेगळे झालो असलो तरी मनाने कधीच दूर नव्हतो. दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्व हा एकमेव समान धागा आहे. आता युती झाल्याने व्यक्‍तीकडे न पाहता. महाभारतातील अर्जुनाला फक्‍त माशाचा डोळा दिसत होता, तसे आता फक्‍त युतीचा विजयच पाहायचा आहे. ज्याठिकाणी धनुष्यबाण असेल तिथे फक्‍त धनुष्यच आणि जिथे कमळ आहे तिथे फक्‍त कमळाकडे लक्ष ठेवू, अशा शब्दांत युती भक्‍कम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता.17) येथे विभागीय संयुक्‍त प्रचार मेळाव्यात केले.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनंतर मराठवाड्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विभागीय संयुक्‍त मेळाव्याने प्रचाराचे रणशिंग फुंकले. श्रीहरी पॅव्हेलियन येथे झालेल्या मेळाव्यात उभय नेत्यांनी वरील आवाहन केले.

सरकारने केलेल्या कामांची व राबवलेल्या योजनांची माहिती देऊन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, निवडणुका येतात-जातात. मात्र, दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. जनावरांसाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. काहींना सवय असते चाराही खातात आणि शेणही. यामुळे कार्यकर्त्यांनी एकही जनावर चाऱ्यावाचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. 

सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय किंवा नाही, रोजगार हमीची कामे सुरु आहेत किंवा नाही यासह मराठवाडा कायमस्वरुपी दुष्काळमुक्‍त करण्याबाबत विचार करण्याचे आवाहन केले. औरंगाबाद शहराचा समांतर जलवाहिनीचा प्रश्‍न युतीचेच सरकार सोडवेल आणि त्यासाठी जे काही करावे लागेल ते करु, याचा पुनरुच्चार केला. 

शिवसेना विकासाच्या आड आली नाही

उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी संघर्ष झाला. दोघेही इरेला पेटलेले होते. मात्र, आता ते उगाळत बसण्याचे कारण नाही. दोन्ही पक्षांचे मनोमिलन करण्यासाठी आपण एकत्र आलो असून, भगवा आणि हिंदुत्व यापासून आपण दूर जाऊच शकत नाही. मतभेद जरी असले तरी शिवसेना सरकारच्या विकासाच्या आड कधीच आली नाही.

आमची मैत्री चोरून नव्हे 

आम्ही टीका केली ती समोरुन केली आणि मैत्रीही केली, तीही चोरुन नव्हे. आज आपण एकत्र आलो. सत्ता जरुर हवी. मात्र ती गरिबांसाठी पाहिले म्हणून एकत्र आलो आहोत. पाच वर्षांचा संघर्ष विसरुन संभाजीनगरचे औरंगाबाद होऊ देऊ नका असे आवाहन केले. 

कोल्हापुरच्या बैठकीत मित्र पक्षांना एकत्र आणू 

फडणवीस म्हणाले, काही वृत्तवाहिन्या आमच्या मित्रपक्षांना बैठकीचे आमंत्रण न दिल्याचे दाखवित होते. या बैठकीत ते जरी नसले तरी, येत्या 24 मार्चला कोल्हापुरात महायुतीच्या बैठकीत मित्रपक्षांना एकत्र आणणार आहे. सर्वांच्या मजबुतीने उभे राहणार आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी हुंकार उभा केला आहे. त्यांच्यासारखा नेता आमच्यासोबत आहे. या निवडणुकीतही मित्रपक्षही आमच्यासोबत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com