Loksabha 2019 : ..तर दौंड शिवसेना भाजपचे काम करणार नाही

Loksabha 2019 : ..तर दौंड शिवसेना भाजपचे काम करणार नाही

केडगाव (पुणे) - भाजप - शिवसेना यांची युती असताना मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवारांना सहकार्य करीत नाही. हे चित्र बदलले नाही तर दौंड तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही असा निर्णय चौफुला (ता.दौंड) येथे झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. 

पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र परस्परांना सहकार्य करण्याच्या कारणावरून शिवसेना व भाजपमध्ये समन्वय नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. प्रचाराची दिशा ठरविण्यासाठी दौंड तालुका शिवसेनेची बैठक झाली. बैठकीनंतर शिवसेनेच्यावतीने प्रसिद्धीपत्रक काढण्यात आले आहे. 

पत्रकात म्हटले की, शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या विरोधात भाजपचे आमदार महेश लांडगे काम करीत आहेत. तर मावळमध्ये आमदार लक्ष्मण जगताप आपल्या समर्थक नगरसेवकांसह विरोधी भूमिका पार पाडत आहेत. या विरोधी भूमिकेचा निषेध करीत आहोत. मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघात भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराला सहकार्य करीत नाही तो पर्यंत दौंड शिवसेना कांचन कुल यांचा प्रचार करणार नाही. असा ठराव यावेळी करण्यात आला. 

यावेळी शिवसेनेचे दौंड विधानसभा संपर्क प्रमुख संजीव शिरोडकर, उपजिल्हा प्रमुख महेश पासलकर, तालुका प्रमुख अनिल सोनवणे, छाया जगताप, संतोष जगताप, नीलेश मेमाणे, सदाशिव लकडे, राजेंद्र मासाळ, चंद्रकांत पिसे, दादा पुणेकर, ताहेर शिकिलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com