Election Results : शिवसेनेचे राजन विचारे आघाडीवर; तर परांजपे पिछाडीवर

Election Results : शिवसेनेचे राजन विचारे आघाडीवर; तर परांजपे पिछाडीवर

लोकसभा निकाल 2019 : ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे आणि शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. या मतदारसंघात शिवसेनेने आघाडी घेतली आहे.

शिवसेनेचे राजन विचारे यांना 149355 मते मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना 59467 मते मिळाली आहेत. 

नरेंद्र मोदींच्या लाटेत शिवसेनेचे राजन विचारे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दोन लाख 90 हजार मतांनी ठाण्यातून निवडून आले होते. यंदा प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात लढत जिंकल्याच्या अविर्भावात युतीचे कार्यकर्ते होते; मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रत्यक्ष प्रचारासह समाज माध्यमांचा पुरेपूर वापर केल्याने लढतीचा प्रवास एकतर्फीपासून "कॉंटे की टक्कर'पर्यंत पोचल्याचे चित्र असले तरी, राजन विचारे हे बाजी मारणार असून शिवसेना गड कायम राखणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com