Loksabha 2019: शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्यांना जागा दाखवा : भारत भालके

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

सलगर बुद्रूक - गेल्या लोकसभेच्या निवडणुकीआधी खोटी आश्वासाने देऊन शेतकऱ्यांच्या जीवावर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेली पाच वर्षे नुसती खोटी आस्वासने देऊन शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. आणि आता परत उमेदवार बदलून आपल्यापुढे मते मागायला येत आहेत. आशा सरकारला उलथवून टाकूया व अनुभव संप्पन सुशील कुमार शिंदेंना संसदेत पाठवूया असे आवाहन आमदार भारत भालके यांनी उपस्थित मतदारांना केले. सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आज सलगर बुद्रूक येथे जाहीर प्रचारसभेचे आयोजन केले होते. त्यावेळी आमदार भालके हे बोलत होते. 

यावेळी त्यांनी गट निवडणुकीवेळी मोदींनी दिलेल्या वेगवेगळ्या आश्वासनांचा पाढाच वाचून दाखवला. या सभेत धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजी काळूगे, रत्नचंद्र बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा, स्वाभिमाणीचे तालुका अध्यक्ष राहुल घुले, संभाजी ब्रिगेडचे प्रा अध्यक्ष क्षीरसागर, पंचायत समितीचे गटनेते नितीन पाटील, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी आपापल्या भाषणातून सरकारवर टीकास्त्र सोडले. 

यावेळी सलगरचे संजय धायगोंडे, बसवराज पाटील, श्रीशेल धायगोंडे, राजू पाटील, चंद्रशा तेली, दादासो पवार, सीताराम हिप्परकर, दिनेश पाटील, शिवाजी धायगोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Show the place for farmers cheaters says Bharat Bhalake