Loksabha 2019 : नांदेडमध्ये सपा, बसपाची अब्दुल समद यांना उमेदवारी 

nanded
nanded

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणूकीचा ज्वर चढु लागला असून शनिवारी (ता. 23) पहाटे भाजपाची उमेदवारी आमदार प्रताप पाटील यांना जाहीर झाली. तर लगेच समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून अब्दुल समद यांना उमेदवारी सपाचे सय्यद मोईन आणि बसपाचे मनिष कावळे यांनी जाहीर केली. मात्र नांदेड मधून कॉंग्रेसची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. 

नांदेड हा कॉग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जातो. या गडाला धक्का देण्यासाठी भाजपाची उमेदवारी खासदार अशोक चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गळ्यात पडली आहे. ही घोषणा शनिवारी (ता. 23) पहाटे एकच्या सुमारास करण्यात आली. ही चर्चा शहरभर सुरू असतांना समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सपा व बसपा युतीचे उमेदवार म्हणून अब्दुल समद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणयात आले. अब्दुल समद हे पूर्वी कॉंग्रेसचे. त्यांनी महापालिकेच्या उमपहापौर पदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे.

नांदेड लोकसभेसह बीड, मुंबईच्या दोन जागा अशा चार जागी समाजवादी पार्टी लढत आहे. तर उर्वरीत 44 ठिकाणी बसपा नशीब अजमावत असल्याचे सय्यद मोईन आणि मनिष कावळे यांनी सांगितले. वंचीत बहुजन आघाडीचा आमच्या युतीवर कुठलाच परिणाम पडणार नसुन आमची थेट लढाई फक्त भाजपसोबत असल्याचे ते म्हणाले. तसेच कॉग्रेस पक्ष हा भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com