Loksabha 2019 : दौंडमध्ये अद्यापही मतदान सुरूच

प्रफुल्ल भंडारी
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- सहा वाजता मतदान केंद्र झाली बंद

- अद्यापही मतदान सुरुच

दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड विधानसभा मतदारसंघात मतदारांनी पळत पळत अगदी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्र गाठल्याने विविध मतदान केंद्रांवर संध्याकाळी साडेसात वाजताही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे.

दौंड शहरातील शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय, गिताबाई बंब शाळा, लाजवंती गॅरेला विद्यालय आणि तालुक्यातील काही गावांमध्ये सहा वाजता देखील मतदारांच्या रांगा होत्या. निवडणूक अधिकारी व पोलिसांनी मतदान केंद्राच्या आत असणाऱ्या सर्वांना उशीर झाला तरी मतदान पूर्ण होईल, याची खात्री देऊन शक्य तिथे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. ठीक सहा वाजता प्रवेशद्नार बंद झाल्यानंतरही अनेक स्त्री - पुरूष मतदार मतदान केंद्राबाहेर पोलिसांना आत सोडण्याची विनंती करीत होते. परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मतदान करण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल अकरा तासांचा अवधी दिलेला असतानाही मतदारांनी शेवटच्या क्षणी गर्दी केली होती.

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड व तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ''दौंड शहरातील काही केंद्र आणि तालुक्यातील नंदादेवी व लोणारवाडी येथे मतदान सुरू आहे व लवकरच ती संपेल. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान झाले होते".

Web Title: Still Voting is Starts in Daund Area