Loksabha 2019 : सुजय विखेंना उमेदवारी; सुजय विरुद्ध संग्राम लढत

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 मार्च 2019

नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने आज (गुरुवार) नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम अरुण जगताप यांच्यात लढत होणार आहे.

नवी दिल्ली : नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने आज (गुरुवार) नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम अरुण जगताप यांच्यात लढत होणार आहे.

भाजपने आज लोकसभा निवडणुकीसाठी 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील 16 नावांचा समावेश आहे. भाजप आणि शिवसेना युती काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यात लढत होणार आहे. भाजपने नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट कापताना भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखेंना संधी दिली आहे. सुजय विखेंच्या प्रवेशावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. अखेर भाजपच्या महाराष्ट्रातील पहिल्या यादीत त्यांचे नाव असल्याचे अधिकृत जाहीर झाले आहे.

नगरसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी बुधवारी संग्राम जगताप यांची घोषणा केली होती. संग्राम जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करतानाच जगताप यांचा विजय निश्‍चित असल्याचेही पाटील म्हणाले होते. आता राधाकृष्ण पुत्राकडून संग्राम जगतापांना कशी लढत मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Sujay Vikhe gets candidature from BJP now will fight with Sangram Jagtap