Loksabha 2019 : उदयनराजेंना कोण टक्कर देणार? रविवारी कळणार सगळ्यांना!

Loksabha 2019 : उदयनराजेंना कोण टक्कर देणार? रविवारी कळणार सगळ्यांना!

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांना टक्कर देण्यासाठी पुरूषोत्तम जाधव की नरेंद्र. अ. पाटील हे येत्या रविवारी (ता.२४) स्पष्ट होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची इच्छा पुरूषोत्तम जाधव, आरपीआयचे नेते अशोक गायकवाड तसेच भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. ही जागा शिवसेनेकडे आहे. आज (शुक्रवार) नरेंद्र पाटील यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख
 उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले, नरेंद्र पाटील हे भाजपमध्ये आहेत. ते आज माझी भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर आले आहेत. या भेटीचा अर्थाचा अनर्थ होऊ नये. या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नका. नरेंद्र पाटील यांच्या संदर्भातील चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली जाईल. त्यासंदर्भातील निर्णय रविवारी तुम्हाला कळेलच, असेही ते म्हणाले.

दरम्यान, हे वृत्त सातारा लोकसभा मतदारसंघात धडकताच राजकीय क्षेत्रात चर्चेस उधाण आले. शिवसेना ही जागा भाजपला सोडेल किंवा पुरूषोत्तम जाधव यांच्याऐवजी नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com