LokSabha 2019 : दानवेंच्या पराभवासाठी सक्षम उमेदवाराला पाठींबा देऊ

Bacchu kadu
Bacchu kadu

जालना : अर्जुन खोतकर यांनी महिनाभर आम्हाला गाफील ठेवून मनोमिलन केले. त्यामुळे मतदारसंघातल्या सर्व ठिकाणी जाता आले नाही. मात्र, दानवेंना पराभूत करण्याचा निर्धार कायम असून वेळप्रसंगी सक्षम उमेदवाराला पाठींबा देऊ असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी (ता.23) कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत सांगितले. तत्पूर्वी 28 मार्च रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे ही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

शेतकऱ्यांविरोधात वक्तव्य केलेल्या एका शब्दावरून मी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. माझ्या विजयापेक्षा त्याचा पराभव महत्वाचा आहे. राजकारण भावनेने होत नसते तर ते मतांच्या संख्येने होत असते. त्यामुळे मी उभा राहुनही दानवे निवडूण आल्यास वेगळा संदेश जाईल. ही लढाई शेतकऱ्यांच्या सन्मानाची आणि अस्‍तीत्वाची आहे. रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर नारळ फोडून प्रचाराला सुरूवात करणार आहे. 288 मार्च रोजी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन लढण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगत दानवेंना पराभूत करण्यासाठी इतर पक्षाच्या सक्षम उमेदवाराला पाठींबा देऊ असेही बच्चू कडू म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com