Loksabha 2019 : पंतप्रधान मोदींची उमेदवारी रद्द करा; तृणमूल काँग्रेसची मागणी

वृत्तसंस्था
Tuesday, 30 April 2019

- पंतप्रधान मोदींनी 'तृणमूल'चे 40 आमदार संपर्कात असल्याचा केला होता दावा.

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार आपल्या संपर्कात आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मोदींनी हा खोटा दावा करून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असून, त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवार (काल) पार पडले. हे मतदान सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसचे 40 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, की ''ममतादीदी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचे मतदारही तुम्हाला सोडून जातील. सध्या तुमच्या पक्षाचे 40 आमदार माझ्या संपर्कात आहेत''.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या विधानावरुन तृणमूल काँग्रेस आक्रमक झाली असून, याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC Writes Letter To Election Commission Demands Cancellation of Narendra Modis Nomination