Loksabha 2019 : पुण्यात पृथ्वीराज चव्हाण की प्रवीण गायकवाड?

Prithviraj Chavan, Pravin Gaikwad
Prithviraj Chavan, Pravin Gaikwad

मुंबई : पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असेल यावर दिल्लीत खलबते सुरूच असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रवीण गायकवाड यांच्यापैकी एकाचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे.

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसमधे घमासान सुरू आहे. दिल्लीत बैठक सुरू असून, 
पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूक लढण्यासाठी विनंती करण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड व पृथ्वीराज चव्हाण यांच्यापैकी कोणाचा नंबर लागणार? याबाबतचे लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.

विरोधकांना रोखण्याचे आव्हान असूनही काँग्रेसचे नेते पुण्यातील उमेदवार जाहीर करण्याचे धाडस दाखवत नाहीत. भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी प्रचाराला प्रारंभ केला तरी, काँग्रेस हायकमांड मात्र उमेदवारांच्या नावांची यादीच चाळत बसल्याचे दिसत आहे. शहर पातळीवरील गटबाजीबरोबरच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील मतभेदही पुण्यातील उमेदवार न ठरण्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. 

लोकसभा, विधानसभा आणि महापलिकेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कमी झाले आहे. पक्षसंघटनेत उत्साह निर्माण व्हावा, असा प्रयत्न एकाही जबाबदार नेत्याने गेल्या पाच वर्षांत केलेला नाही. परिणामी, पक्षसंघटना खिळखिळी होत राहिली. याचकाळात पक्षातील दोघा चव्हाण समर्थकांतील गटबाजी उघडपणे दिसून आली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील सर्व गट एकत्र येत असल्याचे चित्र काही प्रमाणात दिसू लागले आहे; पण त्यातही निष्ठावान आणि अन्य, असा नवा वाद निर्माण झाला. त्यालाही पक्षांतर्गत राजकारणाची किनार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात विलंब झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com