Loksabha 2019 : प्रामाणिकपणे देशसेवा करणाऱ्या सरकारला निवडून द्या : मुख्यमंत्री

राजशेखर चौधरी
बुधवार, 10 एप्रिल 2019

- स्वच्छ भारत अभिनयानांतर्गत गावं स्वच्छ

अक्कलकोट : अक्कलकोट येथे भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपच्या कामगिरीच्या लेखाजोखा प्रभावीपणे मांडत देशविरोधी शक्तींचा बिमोड करण्यासाठी भाजपला मतदान करून शक्ती देण्याचे आवाहन केले. तसेच प्रामाणिकपणे देशसेवा करणाऱ्या सरकारला निवडून द्या, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की अक्कलकोटनगरी ही स्वामी समर्थ आशीर्वादाने पावन झाली आहे .स्वामी नगरीत परोपकार भावना असलेले जयसिद्धेश्वर महास्वामी हे आमचे उमेदवार आहेत. ही निवडणूक गल्लीची नाही ती दिल्लीची आहे. देशाचा मान सन्मान कोण उंचावू शकतो, याचा निर्णय करायचा ही निवडणूक आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, की अनाचारी, भ्रष्टाचारी सरकार आजपर्यंत तुम्ही बघितले. आता केवळ सामान्य माणसाचे काम सतत होत आले आहे. काँग्रेस फक्त घोषणा करते आणि सोडून देते. राहुल गांधीजींचे आजोबा, आजी, वडील, आई सगळे म्हणाले होते, की आम्ही गरिबी हटवू, आता राहुल गांधीही म्हणत आहेत. त्यांनी सगळं काही खाऊन टाकले आहे. ते काय तुमची गरिबी हटवणार? मोदींनी पैसे आणायचे आणि सत्तेत येऊन वाटणार तुम्ही का? मोदी समर्थ आहेत त्याला. कशाला पाहिजे तुम्हाला सत्ता.

जनतेला मूर्ख बनवू नका

काँग्रेसची योजना काय आहे तेच मला कळत नाही. तुम्ही जनतेला मूर्ख बनवू नका. गरिबीसोबत दोन हात केलेले केवळ नरेंद्र मोदी आहेत. काँग्रेसचा गरिबीशी काहीही संबंध नाही. जनतेला थेट निधी देण्यासाठी सर्वांना बँकेचे खाते काढून घेतला. हा काय भ्रष्टाचार कमी होण्याची मार्ग नाही का ?, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

स्वच्छ भारत अभिनयानांतर्गत गावं स्वच्छ

स्वच्छ भारत अभियानात शहर व गावे स्वच्छ होत आहेत. देशात सर्वत्र शौचालय बांधले. उज्ज्वला योजना देशात सर्वांत चांगल्याप्रकारे राबविण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात धूरमुक्त योजना राबविली गेली. माता-भगिणींना उज्जलासारखी योजना आणली. देशात कोणीही बेघर राहणार नाही, यासाठी प्रत्येक गरिबाला घर देणारी योजना अंमलात आणली गेली. या व इतर अनेक प्रश्न व योजनांची मांडणी करत जोशपूर्ण भाषणाने खचाखच भरलेल्या मैदानवरची सभा मात्र एक हाती जिंकली. यावेळी अक्कलकोटला विजय संकल्प रॅली झाली. 

पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, रघुनाथ कुलकर्णी, लोकसभेचे उमेदवार डॉ जयसिद्धेश्वर महास्वामी, राजेंद्र मिरगणे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार,सोलापूरचे महापौर शोभा बनशेट्टी,सचिन कल्याणशेट्टी,नगराध्यक्षा शोभा खेडगी
महेश हिंडोळे,आनंद तानवडे,बाळासाहेब मोरे,भीमाशंकर इंगळे, संजय कोळी,दत्तात्रय तानवडे, संजय देशमुख,सूर्यकांत कडबगावकर,बसलिंगप्पा खेडगी,परमेश्वर यादवाड,गणेश वानकर,रासप जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर,योगेश पवार,मोतीराम राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Vote to Our BJP Party says Devendra Fadnavis