Loksabha 2019 : आम्ही काय एका पक्षाचे, नेत्याचे गिऱ्हाईक आहोत का?

Narendra Modi Rahul Gandhi
Narendra Modi Rahul Gandhi

राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर तुम्हीही भाष्य करू शकता, असं आवाहन 'ई सकाळ'ने केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून 'ई सकाळ'चे वाचक सौरव पाटील यांनी पाठविलेले त्यांचे मत, त्यांच्याच शब्दांत!

आपण सर्व भारतीयांनी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की आपण संसदीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे अध्यक्षीय नव्हे. भारतातील काही अपवाद सोडले तर सर्वच न्यूज चॅनेलवर नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे चित्र उभे केले आहे. मग त्यासाठी नमो Vs रागा, नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी - यूथ कोर्ट, प्रधानमंत्री कौन बनेगा? यांसारखे कार्यक्रम सर्वत्रच दिसतात. यावरून शंका येते की आपली लोकशाही ही संसदीय आहे की अध्यक्षीय?

संसदीय पद्धत गेली सत्तर वर्षे आपण यशस्वीपणे चालवली आहे आणि पुढेही आपल्याला ती चालवायची आहे. माध्यमांतून असे अध्यक्षीय लोकशाहीचे चित्र काही घटक उभे करतात. मग त्यातील एका नेत्याचे समाज माध्यमांतून चारित्र्यहनन केले जाते. त्यासाठी काही ठराविक टोळ्या सक्रिय असतातच. मग यातून या एका नेत्याशिवाय भारताला कोणीच तारू शकत नाही आणि तुमच्याकडे दुसरा पर्यायच शिल्लक नाही असे वातावरण तयार केले जाते. पण, मुद्दा आहे तो आपण स्विकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीचा. आम्ही उमेदवार कसा आहे त्यावरून मत देऊ. पुढे मग ज्याचे जास्त खासदार त्या पक्षाच्या संसदीय समितीद्वारे एक नाव पुढे येईल आणि राष्ट्रपतींनी परवानगी देताच लोकसभेत विश्‍वासदर्शक ठराव मंजूर होऊन आमचा पंतप्रधान ठरेल. ही आपली पद्धत आहे. पण असे न होता व्यक्तीकेंद्री राजकारणाकडे आपण वळत आहोत.

माध्यमांद्वारे दाखविले जाणारे कार्यक्रम संसदीय लोकशाहीसाठी घातक ठरतात, कारण यातून त्या नेत्याकडे किंवा पक्षाकडे बघून मत देण्याचे आवाहन केले जाते. वास्तविकता आपण कोणत्या पक्षाचे किंवा नेत्याचे गिर्‍हाईक आहोत का? तसे असेल तर तुम्ही सरळ घोषित करा, की आपण अमेरिकी अध्यक्षीय स्वरूप स्विकारले आहे. मग तशी घटना दुरुस्ती करा त्यास न्यायालयाची परवानगी मिळवा मग आम्ही मान्य करू. 

भारतात हे दोन पक्ष सोडून ही इतर अनेक पक्ष आहेत त्याचाही तितकाच विचार व्हायला हवा. निवडणूक आयोगाकडे 7 राष्ट्रीय, जवळपास 51 प्रादेशिक तर 2293 इतर नोंदणीकृत पक्ष आहेत. या सर्वांमुळेच आपली लोकशाही आज सक्षम आहे. किमान राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचा माध्यमांसोबत आपणही गांभीर्याने विचार करायला हवा. त्या पक्षाच्या विचारधारा समजून घ्यायला हव्यात. डावी विचारसरणी असलेले पक्ष - उजवी विचारसरणी असलेले पक्ष, धार्मिक सांप्रदायिक पक्ष (Communal Parties), धर्मनिरपेक्ष पक्ष (Secular Parties) हे समजून उमजून या राजकारणाकडे पाहायला हवे. भारताची लोकशाही यशस्वीपणे चालवायची असेल तर त्यासाठी प्रथमतः भारतातील सर्व राजकीय पक्षांचे लोकशाहीकरण व्हायला हवे. शेवटी काय आपल्यालाच ठरवावे लागेल आपल्यासाठी भावनिक - धार्मिक प्रश्न महत्त्वाचे आहेत की, जीवनावश्यक सोयीसुविधांचे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत ते.

ज्या दिवशी आपले राजकारण विखारी अपयशी पाकिस्तान, राम मंदिर, गर्व से कहो हम... है, मंदिर यही बनेगा यांसारख्या धार्मिक, जातीय, भाषिक, सांस्कृतिक, लैंगिक द्वेष पसरवणाऱ्या मुद्द्यांवरून शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते, पाणी, वीज, शेती, उद्योग यांसारख्या सामाजिक - आर्थिक विकासाच्या मुद्दय़ांवर उभे राहील त्या दिवशी आपल्या भविष्याला खऱ्या अर्थाने आशादायी चित्र निर्माण होईल.

---------------------------------------------

राज ठाकरे यांनी निवडणूक न लढविण्याचा घेतलेला निर्णय कुणाच्या पथ्यावर पडेल?

युती आणि आघाडीमध्ये जागा वाटपावरून नाराज झालेले नेते काय करू शकतील?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याचा हुकूमी एक्का कोण?

तरुण रक्ताला राजकारणात वाव दिला जात आहे की नुसतीच घराणेशाही सुरू आहे?

यंदाच्या निवडणुकीचा 'सीन' काय आहे?

विश्‍लेषण फक्त पत्रकारांनीच करावं, असं थोडंच आहे! तुम्हीही बिनधास्त मांडा तुमची मतं आणि निरीक्षणं.. किमान 150 शब्दांत लेख लिहा आणि ई-मेल करा webeditor@esakal.com इथे आणि सब्जेक्‍टमध्ये लिहा 'माझे विश्‍लेषण'! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com