Loksabha 2019 : अमित शहा, राहुल गांधींचं भवितव्य ठरलं; देशात 63.83 टक्के मतदान!

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 एप्रिल 2019

- देशातील 116 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज (ता.23) पार पडले. सकाळी सात वाजता या मतदानाला सुरवात झाली. त्यानंतर सायंकाळी सहाला हे मतदान पूर्ण झाले. देशात 63.83 टक्के इतके मतदान पार पडले असून, 116 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले. 

महाराष्ट्र, बिहार, गोवा, जम्मू-काश्मीर या राज्यांसह त्रिपुरा, उत्तर प्रदेश या राज्यांतही मतदान पार पडले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 79.36 टक्के इतके मतदान झाले. तर जम्मू-काश्मीर सर्वांत कमी 12.86 टक्के मतदान पार पडले. तसेच त्रिपुरात 78. 37 तर आसाममध्ये 76.23 टक्के मतदान झाले आणि महाराष्ट्रात 56.55 टक्के इतके मतदान झाले.

याशिवाय बिहार 59.97, गोवा 71.09, गुजरात 59.98, 
कर्नाटक 64.01, केरळ 70.20, ओडिशा 58.18, उत्तर प्रदेश 57.74, छत्तीसगड 65.82 टक्के इतके मतदान झाले तर दादरा-नगर हवेली 71.43, दमण दीव 65.34 इतके मतदान पार पडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting Completed in India 63.83 Percentage Till 6 PM