Loksabha 2019 : नांदेड जिल्ह्यात मतदानाला शांततेत सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नांदेड : भाजप व  काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 18) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील दोन हजार 028 केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत 7.47 टक्के मतदान झाले. 

नांदेड लोकसभेमध्ये 14 उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत कांग्रसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण व भाजपचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर  यांच्यात सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. यशवंत भिंगे रिंगणात आहेत. 17 लाख 17.हजार 825  मतदार असलेल्या मतदार संघात पहिल्या तीन तासांत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. केवळ महिला कर्मचारी असलेले सखी मतदान केंद्र आणि केवळ दिव्यांग कर्मचारी असलेले स्वावलंबी मतदान केंद्र हे वेगळे वैशिष्ट्य आहे. मतदान प्रक्रीयेसाठी 11 हजार 155 कर्मचारी आणि 5 हजार 665 असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान प्रक्रीयेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम तयार केली असून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे रुममधून प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: voting starts at nanded