Loksabha 2019 : विदर्भातील तीन मतदारसंघांत उद्या मतदान 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत मंगळवारी प्रचारतोफा थंडावल्या. 

नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी विदर्भातील अमरावती, अकोला व बुलडाणा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघांत मंगळवारी प्रचारतोफा थंडावल्या. 

विदर्भातील दहा मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांत पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी मतदान झाले होते. आता उर्वरित अमरावती, अकोला व बुलडाणा या तीन मतदारसंघांत गुरुवारी मतदार आपल्या उमेदवारासाठी मतयंत्रात मत बंदिस्त करतील. या मतदारसंघांत गेले दहा दिवस सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारमोहिमा राबविल्या. उमेदवार व पक्षाच्या कार्यंकर्त्यांनी जाहीर सभा, बाइक रॅली, मोहल्ला सभा आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. दहा दिवस प्रचाराचा धुराळा उडविल्यानंतर मंगळवारी प्रचाराचा समारोप करण्यात आला. आता मतदानाच्या दिवसाकडे उमेदवारांच्या नजरा लागल्या आहेत. 

उमरखेडमध्येही उद्याच मतदान 
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड व महागाव या दोन तालुक्‍यांचा समावेश असलेले उमरखेड विधानसभाक्षेत्र लगतच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहे. येथेही गुरुवारीच मतदान पार पडेल.

Web Title: Voting in three constituencies in Vidarbha tomorrow