Loksabha 2019 : कर्जतमधील प्रश्न सोडविण्यासाठी लोकसभेत जायचे आहे - पार्थ पवार

संतोष पेरणे 
सोमवार, 15 एप्रिल 2019

नेरळ - कर्जत तालुक्यातील वन जमिनीवर घर करून राहणारे आदिवासींना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे. आणि वन खात्याच्या परवानग्यासाठी आडून राहिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे. अशा मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी भावना व्यक्त केला. कशेळे येथील प्रचारसभेत पार्थ पवार बोलत होते.

नेरळ - कर्जत तालुक्यातील वन जमिनीवर घर करून राहणारे आदिवासींना घरापर्यंत जाणारा रस्ता बनवायचा आहे. त्यांच्या घरात वीज पोहचविण्याचे काम करायचे आहे. आणि वन खात्याच्या परवानग्यासाठी आडून राहिलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपल्याला संसदेत जायचे आहे. अशा मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी भावना व्यक्त केला. कशेळे येथील प्रचारसभेत पार्थ पवार बोलत होते.

कर्जत तालुक्यातील कशेळे येथील हनुमान मंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कर्जतचे आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे सभापती नारायण डामसे, नरेश पाटील, सदस्या रेखा दिसले, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव, उमेश पाटील, शेकापचे नेते विलास थोरवे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे,जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरविंद पाटील, तालुका कार्याध्यक्ष संजय गवळी, शेकाप तालुका चिटणीस प्रवीण पाटील, स्थानिक सरपंच हर्षाली राणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राम राणे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ सरचिटणीस नियुक्ती करण्यात आली.

सभेला संबोधित करताना पार्थ पवार यांनी आपल्याला लहान मुलांसाठी केंद्र पातळीवरील शाळा सुरू करायच्या असून आदिवासी भागातील एकही गाव, वाडी वीज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही यासाठी आपल्याला लोकसभेत पाठवावे अशी विनंती केली. पवार यांनी पुढे बोलताना भीमाशंकर घाटरस्त्याचा प्रश्न भाजप सरकारने सोडविला नाही. त्याचवेळी आजही अनेक आदिवासी वाड्या रस्त्याने जोडल्या नाहीत याची आठवण करुन दिली. हे प्रश्न सोडविण्यासाठी आणि अनेक रस्त्यांचे रुंदीकरण हे वन जमिनीचा प्रश्न सोडविला गेला नसल्याने रखडले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला लोकसभेत पोहचायचे आहे असेही पार्थ पवार बोलताना म्हणाले. माथेरान सारख्या पर्यटन स्थळी जाण्यासाठी वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तसेच माथेरान आणि सहयाद्री या डोंगर रांगाना लागलेला इको सेन्सेटिव्ह झोनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवायचा आहे आणि काँग्रेस आघाडीने तो पर्याय मावळ लोकसभा मतदारसंघात निर्माण केला आहे. त्याला आपले प्रेम पाहिजे आहे असे आवाहन पार्थ पवार यांनी केले.

याप्रसंगी शेकापचे नेते विलास थोरवे यांनी आमच्या कार्यकर्त्यांसाठी पाथरज प्रभाग जास्त मताधिक्य देतो की कळंब प्रभाग यावर स्पर्धा चालली आहे. आम्ही आमच्या नेत्यांनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानून पार्थ पवार यांना मताधिक्य देणार असा विश्वास थोरवे यांनी व्यक्त केला. आमदार सुरेश लाड यांनी आम्ही पार्थ पवार यांची उमेदवारी मागून घेतली असून 10 वर्षात आम्ही अनेक आदिवासी वाड्यांना वीज पुरवठा पोहोचविला आहे. विद्यमान खासदारांनी तुंगी मध्ये लाईट कोणत्या शिवसेना नेत्यांसाठी नेली हे त्यांनी जाहीर करावे असे आवाहन केले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस उमेश पाटील यांनी आपल्या भाषणात भाजप, शिवसेना यांच्या सरकारवर जोरदार हल्ला आपल्या भाषणात चढविला.

कळंब येथील सभेत बोलताना सिडकोचे माजी प्रमोद हिंदुराव यांनी आपले उमेदवार हे पदवीधर आहेत. मात्र विरोधी पक्षाचे उमेदवार हे केवळ नववी शिकलेले आहेत. त्यामुळे मतदारांनी कोणाला मत द्यायचे हे ठरवावे असे आवाहन हिंदुराव यांनी केले. कळंब येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना कर्जतचे माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी कर्जत तालुक्यात खासदारांनी कोणती कामे केली ते सांगावे असे आवाहन करून तुंगी मध्ये वीज नेली ती शिवसेनेच्या काही नेत्यांच्या जमिनी त्या ठिकाणी आहेत म्हणून नेली असा आरोप त्यांनी केला.तर शेकापचे तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी कर्जत तालुक्यातील खांडस-कळंब-आंबिवली पट्ट्यातील जमिनी यांना पश्चिम घाटामध्ये समाविष्ट करून येथील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण केला आहे. त्या प्रश्नावर पार्थ पवार यांनी न्याय मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: want to solve problems of a tribes in karjat says parth pawar