Loksabha 2019 : आम्हीही उदयनराजे यांचे चाहते : रामराजे निंबाळकर

Loksabha 2019 : आम्हीही उदयनराजे यांचे चाहते : रामराजे निंबाळकर

कऱ्हाड : तुम्हीच एकटे उदयनराजे भोसले यांचे चाहते नाही. तर आम्हीही त्यांचे चाहते आहोत, असे विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज (रविवार) सांगितले. 

कऱ्हाड येथे काँग्रेस व राष्ट्रवादीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. निंबाळकर यांनी सभेत दंगा करणाऱ्या युवकांना उद्देशून विधान व्यक्त केले. ते म्हणाले, उदयनराजे यांची क्रेझ आजही अत्यंत चांगली टिकून आहे. हे पाहून आनंद वाटला. उदयनराजे भोसले यांचे भाषण ऐकण्याची जशी तुमची इच्छा आहे. तशी आम्हालाही त्याची उत्सुकता आहे, असेही ते म्हणाले.

तसेच यावेळी कवाडे म्हणाले, देशाला भगवा नाही. भाजप सरकारने नागवं केले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पायदळी तुडविण्याचे काम भाजपच्या मोदी सरकारने केले. मोदींची छाती 56 इंच आहे. मात्र, त्या छातीत शेतकऱ्याला जागा नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com