Loksabha 2019 : आपण बारामतीची निवडणूक जिंकलेली : मुख्यमंत्री

राजेंद्रकृष्ण कापसे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र

खडकवासला : मागील लोकसभा, विधानसभा, महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काम केले. त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट करा. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचा. आपण बारामती लोकसभेची निवडणूक जिंकलेली आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची सुपे (ता.बारामती) मोठी जाहीर सभा झाल्यानंतर संध्याकाळी पुण्यात खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार कांचन कुल, आमदार राहुल कुल, आमदार भीमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, गणेश बीडकर, भाजपचे मतदार संघाचे अध्यक्ष अरुण राजवाडे, शिवसेनेचे मतदार क्षेत्र प्रमुख नितीन वाघ यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणूक लढविलेले उमेदवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तुम्ही निवडणूक लढविली त्या प्रत्येक बुथवर किती मतदान झाले. याची आकडेवारी आमच्याकडे आहे. आता तुम्हाला मतदान केलेल्या आणि इतर सर्व मतदारापर्यंत तुम्ही उमेदवार व त्याचे चिन्ह पोहचवा. तुमच्या बुथवर किती मतदान झाले. याची माहिती निवडणुकीनंतर आम्हाला कळणार आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करा. कोणी केले नाही. हे तुमच्या गावात झालेल्या मतदानावर कळणार आहे. कोणी काम केले. येथील उमेदवार निवडून आल्यानंतरचे श्रेय तुमचे आहे. मोदी-फडणवीस यांचे श्रेय नाही. यश तुमचे आहे. तसे अपयश देखील तुमचे आहे.असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत काम करण्याच्या सूचना दिल्या. 

तसेच ते पुढे म्हणाले, ही निवडणूक मॅनेज आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांचे व पवारसाहेब यांचे व संबंध आहे, असे सांगून तुमचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सांगितले जात आहेत. मागील पाच वर्षे पाहिले असेल दोन्ही पक्ष सत्तेचे मालक होते. मीडिया व अफवा स्टंटबाजीवर लक्ष देऊ नका, असा सल्ला ही मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मुख्यमंत्र्यांना थेट फोन करा

काही ठिकाणी चुकीचे वातावरण दिसल्यास, काही अडचणी असल्यास मुख्यमंत्री किंवा चंद्रकांत पाटील यांना फोन करुन सांगा, असे सांगत राहुल कुल यांनी दोघांचे नंबर कार्यकर्त्याना दिले.

Web Title: We have won Baramatis Loksabha Election says Devendra Fadnavis