Loksabha 2019: बारामती लोकसभा मतदार संघात विजय निश्चित - रोहित पवार 

संतोष आटोळे 
सोमवार, 8 एप्रिल 2019

बारामती - लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे. त्यामुळे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजणांनी सुप्रिया ताईंना सर्वाधिक मताधिक्य देणारा तालूका आपलाच असावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.  

बारामती - लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित आहे. त्यामुळे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजणांनी सुप्रिया ताईंना सर्वाधिक मताधिक्य देणारा तालूका आपलाच असावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.  

बारामती लोकसभा मतदार संघांअंर्तगत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामती मधीर राष्ट्रवादी भवन येथे आयोजित शिर्सुफळ-गुणवडी जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्याशी संवाद प्रसंगी रोहित पवार बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे कार्याध्यक्ष नितीन शेंडे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते, बुथ कमिटी सदस्य उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी प्रचाराची दिशा कोणती असावी, बूथ रचना कशी असावी तसेच प्रचाराच्या अंतिम दिवसापर्यंत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कशाप्रकारे पोहचता येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सर्वसामान्य नागरिक असोत किंवा पक्षाचे पदाधिकारी असोत प्रत्येकजण प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. आपल्या पक्षाचा विचार, भविष्यातील योजना लोकांपर्यंत पॊहचवत आहेत. जनतेचा तसेच कार्यकर्त्यांचा मिळणारा हा प्रतिसाद हा पवार कुटुंबावर असलेले प्रेम व विकासाला साथ याचे प्रतिक आहे. असे सांगत सुप्रिया सुळे यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

दवाखाना ते थेट कार्यकर्ते संवाद आणि भावनिक साद
पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे पुण्यातील खाजगी रुग्णारयात त्यांना दाखल व्हावं लागलं. ऑपरेशन करावे लागले. तर दुसरी कडे सर्व कार्यकर्ते दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहेत. या जाणीवेपोटी दादांनीही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच थेट बारामती येथील कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संदेश देताना सर्व जण वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे फक्त आपल्याही तब्येतीचीही काळजी घ्या अशी भावनिक साद घातली.

Web Title: we win going to win in Baramati Lok Sabha Constituency says rohit pawar